ज्यांनी कैरी खाल्ली ते म्हणाले आंबट, ज्याना पिकलेले फळ मिळाले ते म्हणाले गोड .
मुलांना मिळते कैरी नातवंडांना मिळतो आंबा आणि एकुलते एक नातवंड असेल तर हापूसचा आंबा.
मुखी कुणाच्या पडते कैरी कुणा मुखी आंबा
नशिबाचा की काळाचा गुण हा तुम्हीच ठरवुन सांगा .
[02/11, 14:53]
सुट्टीचा दिवस , लवकर कशाला उठायच?
एरवी असतेच घाई , आज मस्त पडून रहायच !
आरामात पेपर वाचत तब्बेतीत चहा घेऊया
ही काही बनवत्येय वाटत,येईल तेव्हा पाहूया
सकाळी गर्दी असेल , हिला देखील पटलं
एवढं तरी एकमत झालं केवढ आश्चर्य वाटलं
जेवल्यावर सुस्ती आली म्हटले जरा झोपूया
छान झोप झाली की मत द्यायला जाऊया
कोणाला मत दयायचं का आणि कशाला
काय फरक पडतो ? सारा आवाज थांबला
जाग आली तेव्हा पाच वाजून गेले होते
ओळखीच्या सगळ्यांचे मिसकॉल दिसत होते
चहा घेऊन विट्ठल रख्माई रांगेत उभे राहिले
कोणाला तरी मत देऊन सहा वाजता परत आले. गजानन गुर्जरपाध्ये .
02/11, 14:53]
दररोज कसला ना कसला दिन नाहीतर सण असतो आणि थंड , कोरड्या आणि उष्ट्या शुभेच्छा पाठवणार्याना नुसता ऊत येतो ऊत !
तळहाती मोबाईल घेऊन मग मीही शुभेच्छांचा कचरा पुढच्या मोबाईलकडे पाठवत रामप्रहर हराम करतो आणि सिलिकॉन दरीत राहणारे महापुरुष आठवत थंड चहाची आचमने घेतो !
गजानन गुर्जरपाध्ये .
[02/11, 14:53]
कोणताही खेळ खेळा गळ्यात घालून गळा मजेत रहा हसत रहा जमतय का ते पाहा
[02/11, 14:53]
दाराआड उभी गप्प
केरसुणी कोपर्यात
मला नाही मुळी सोस
प्रसिद्धीचा हे जपत
न्हाणीघरातला झाडू
होईल का माझा भिडू
म्हणे स्वत:शी लाजून
आहे झुरत अजून
गजानन गुर्जरपाध्ये
02/11, 14:53]
शीर्षक : फोल औपचारिकता !
येऊ का आत
आहात का घरात
चालेल का आलो तर
की नंतर कधितरी येऊ
आहात का मोकळे
दूरध्वनीवरचे वरवरचे
आपण इतराना किंवा
इतरानी आपल्याला
केलेले हे सवाल व्यर्थ
कोण म्हणेल ?पण
खर सांगायचं तर...
आपल्या जीवनात काय
आणि मनात तरी काय
विचारून कुणी येत नाही
आणि घालवून द्यावे म्हणून
घालवताही येत नाही
[02/11, 14:53]
असून पोट भरले तोंडाला पाणी सुटले !
[02/11, 14:53]
आजी नव्हती तरिही केला खिडकीला मी टाटा
नव्हता आंबा तरिही आला सदैव हाती बाठा
विशेष काही नसता पदरी उदरीं उदंड ताठा
केला नाही उदीम तरीही नित्याचा होता घाटा
प्रतिभा नाही स्फूर्ती नाही यमकांचा होता साठा
तोच रिकामा झाला आता रितेपणा उरला मोठा गजानन गुर्जरपाध्ये
येथून जायचा दिवस कोणता नकळे
येथून जायचा दिवस कोणता नकळे
जायचे कुठे ते धुक्यात स्थळ लपलेले
येईल न्यायला जन्मसखा म्हणतात
जाईन त्यासवे आनंदाने गात
श्वासांची सुटता संगत जन्मभराची
घाईने करतील होळी या देहाची
रक्ताचे करुनी पाणी साठवलेली
घेतील वाटुनि माया जिवलग सगळी
गुर्जरपाध्ये 12-6-2020
मी झाले विधवा धरिता तुमचा हात
मन तुमचे नव्हते कधीच संसारात
इतिहासात गुंतले होते ते दिनरात
पति असुनी नव्हते पतिसुख मम दैवात
जनलज्जेस्तव वा आग्रह माझा म्हणूनी
उजवली कूस घर भरले दोन मुलांनी
शय्येहुन सुटका म्हटले महाराजांनी
अटकेवर झेंडा लावा (मनात) म्हटले मीही
गुर्जरपाध्ये 13-6-2020
ती विश्वमोहिनी (विश्वसुंदरी /विश्वविजेती )नखरेवाली नार
सर्वांच्या ओठी लागतसे हळुवार
कोशात गवसती विभ्रम मोहक काही
त्यानाही वश ती अजुनी पुरती नाही
नवनवीन लकबी अगणित लोभसवाण्या
पाहून होत जनमुद्रा केविलवाण्या १५/०६/२०२०
सर्वांच्या ओठी लागतसे हळुवार
कोशात गवसती विभ्रम मोहक काही
त्यानाही वश ती अजुनी पुरती नाही
नवनवीन लकबी अगणित लोभसवाण्या
पाहून होत जनमुद्रा केविलवाण्या १५/०६/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा