आपल्या बाकावर डकवलेला क्रमांक आणि हॉल तिकिटावर असलेला क्रमांक एकच असल्याची तिनतिन वेळा खात्री करून घेतली होती.बेल झाली आणि जीवघेण्या शांततेत स्कर्टब्लाऊज घातलेल्याआणि बॉबकट केलेल्या सुपरवायजर आल्या. हॉलतिकिट पाहण्याचा कार्यक्रम न बोलताच पार पडला.पुरवणी मागण्यासाठी सुद्धा बोलायचा प्रसंग आला नाही.नुसते उभे राहिले की मॅडम अगोदरच सही करून ठेवलेली पुरवणी देत होत्या.इंग्रजी बोलण्याचे मरण अजून ओढवले नव्हते.माझा पेपर वेळेपूर्वी झाला .मी उभा राहिलो.मॅडणी बाकाजवळ आल्या. मी त्यांना मोठ्या प्रयत्नाने जुळवलेल्या इंग्रजीत म्हटले," I want a rope". त्यांनी टेबलावर ठेवलेला दोरा आणला आणि शुद्ध मराठीत हळू आवाजात म्हणाल्या " याला थ्रेड किंवा स्ट्रिंग म्हणतात."त्यांच्या पेहरावामुळे, त्याहीपेक्षा बॉबकटमुळे त्यांच्याशी इंग्लीशशिवाय कोणत्याही भाषेत बोलणे( अलिकडच्या शब्दात, संवाद साधणे) शक्य नाही असे मला वाटले होते .
शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२
इंग्लीश
अकरावीच्या शेवटी बोर्डाच्या परीक्षेला माझा नंबर एका कॉन्व्हेंट शाळेत आला.भव्य इमारत आणि त्याहूनही इंग्लीश बोलावे लागणार याची भीती परीक्षेच्या काळजीपेक्षा जास्त भेडसावत होती.आई किंवा वडील मुलाला परीक्षाकेंद्रावर सोडायला येण्याची पद्धत सुरु झाली नव्हती.माझ्या मोठ्या भावाच्या शब्दात, ' रानात झाडे आपोआप वाढतात तशी मुले आपोआप वाढतात 'असा बहुतेक पालकांचा समज होता.आठवीत एबिसिडी शिकायला सुरुवात केलेले, चाळीच्या इमारतीत भरणाऱ्या शाळेत जाणारे आणि कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणारे आम्ही कशा भांबावलेल्या मन:स्थितीत होतो याची कल्पनाच करावी लागेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा